अभ्यंकर मंडळाची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व कुलसंमेलन रविवार दिनांक ०७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वा. “काशीकर गणेश मंगल कार्यालय", ब्राह्मण पुरी, अंबाबाई तालिम जवळ, मिरज जिल्हा सांगली ४१६४१० येथे आयोजित करण्यात येत आहे. सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
मंडळाचे पदाधिकारी
श्री निशिकांत शंकर
अध्यक्ष
श्री नरेंद्र अनंत
उपाध्यक्ष
श्री सुरेश कृष्णराव
खजिनदार
श्री विवेकानंद दत्तात्रय
चिटणीस

मंडळाचे विशेष

अभ्यंकर कोण ?

अभ्यंकर हे वासिष्ठगोत्रिय चित्तपावन कोंकणस्थ ब्राह्मण. अभ्यंग म्हणजे मखणे, उटी-तेल लावणे. ब्रह्ममुहूर्ती अभ्यंग स्नान करणारे ते अभ्यंकर. अभयंकर वा अभ्यंकर असाही एक विचार प्रवाह आहे. आश्रयाला येणा-या व्यक्तींना वा शरणागतांना अभय देणारे अभ्यंकर होत. असे अभय सत्ताधारी व्यक्ती देऊ शकते. अभ्यंकर सत्ताधीश असल्याचे इतिहास सांगत नाही. मात्र ब्रह्मविद्येने आत्मसाक्षात्कार अनुभवलेली व्यक्ती असे अभय देण्यास समर्थ असते.

कै. श्री ज. द. उर्फ जनार्दन दत्तात्रय अभ्यंकर

कै. श्री ज. द. उर्फ जनार्दन दत्तात्रय अभ्यंकर हे अभ्यंकर कुलवृत्तांताचे खरे जनक होय. याबद्दल सांगावयाचे म्हणजे श्री ज. द यांनी अभ्यंकर परिवाराच्या कुलवृत्तांतामधील मनोगतात जी माहिती दिली आहे त्या आधारे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश विदेशातील अभ्यंकर कुलबंधू-भगिनींना स्वतः त्यांच्या घरी भेट देऊन व पत्रव्यवहार करुन जी मोलाची माहिती मिळविली त्यामुळे अभ्यंकर कुलवृत्तांत प्रकाशित करुन व जतन करुन ठेवल्याने आज हा ग्रंथ म्हणजे ज. द यांनी दिलेला हा लाख मोलाचा ठेवाच आहे असे म्हण्टल्यास वावगे होणार नाही.

अभ्यंकरांचे कुलदैवत

अभ्यंकरांचे कुलदैवत म्हणून विविध देवदेवतांचा निर्देश येतो. कुर्ध्याचे महाविष्णु व महागणपति, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई, अंबेजोगाईची योगेश्वरी वा जोगेश्वरी वा जोगाई, गुहागरचा व्याडेश्वर, कोकणचा आदित्यनाथ इत्यादी दैवते अभ्यंकर कुलाच्या देव-देवता म्हणून पूजल्या जातात. वरवर नावांची भिन्नता असली तरी एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति, या ऋग्वेद वचनाप्रमाणे चित् तत्त्व एकच आहे, हे ज्ञानोपासक अभ्यंकरांना वेगळे सांगावयास नकोच.

अभ्यंकरांचे कुळाचार

प्रत्येक कुळात पिढ्यान् पिढ्या निरनिराळे कुलधर्म व कुळाचार पाळले जातात. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरांचे पालन आजवर लोक करीत आले आहेत. परंतु आधुनिक काळात या परंपरांचा झपाट्याने लोप होत चालला आहे. या कुलाचारपालनामुळे आपला कुलस्वामी, आपली कुलदेवता, आपली ग्रामदैवते यांचे स्मरण होते; आपला मूळ गाव आठवतो. आपल्या कुलातील मंडळींचे स्थलांतर केव्हा, कोठे, कसे होत गेले याचाही बोध होतो.

अभ्यंकर मंडळाच्या कार्यकारी मंडळाने विद्यावाचस्पति शंकर अभ्यंकर यांचा सम्मान चिन्ह देऊन सत्कार केला। मंडळाचे अध्यक्ष श्री संजय प्रभाकर, उपाध्यक्ष श्री निशिकांत शंकर, सचिव श्री विवेक दत्तात्रय व खजिन दार श्री अशोक विद्याधर अभ्यंकर।