सासवणे हे गाव रायगड जिल्ह्यात समुद्र किनारी असून अलिबाग पासून 20 कि.मी. अंतरावर आहे. मुंबई व ठाणे येथून थेट एस.टी.ची बससेवा अलिबाग-किहिम-आवास तर्फे सासवणेपर्येंत उपलब्ध आहे. तिथे फडके, कर्वे, म्हसकर, अभ्यंकर, कुंटे व फाटक इ. कोकणस्थ ब्राह्मणांची घरे असून अभ्यंकरांची 5-6 घरे बागबगीचा शेतीवाडीसह आजही अस्तित्वात आहेत. या गावची लोकसंख्या 3000 असून गावात राम, शंकर व देवीची मंदिरे आहेत. या ठिकाणी अभ्यंकरांचे पुर्वज केव्हा व कुठून आले ते निश्चित पुराव्यानीशी सांगता येत नसले तरी मूळ रत्नगिरी जिल्ह्यातील नारिंग्रे या गावाहून कुणीतरी चरितार्थासाठी येऊन वस्तीस राहिले व स्थायिक झाले असावेत. कुळ कायदा व इतर सामाजिक बदलामुळे जवळच असलेल्या मुंबई सारख्या औद्योगिक शहराकडे व आसपास काहीजण नोकरी निमित्त गेल्या 40-50 वर्षात गेल्याचे दिसते. सध्या हयात असलेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील वंशावळी व व्यक्तिपरिचय दिला आहे.
सासवणे येथे आज अस्तित्वात असलेली अभ्यंकर कुटुंबियांची घरे पुढीलप्रमाणेः-
1) श्री विद्याधर रामचंद्र अभ्यंकर- स्वतः रहातात
2) श्री अच्चुत श्रीधर अभ्यंकर- स्वतः रहातात
3) श्री वसंत काशीनाथ अभ्यंकर- स्वतः रहातात
4) श्री गजानन आत्माराम अभ्यंकर, भालचंद्र उर्फ सावळाराम आत्माराम अभ्यंकर हे विलेपार्ले येथे रहात असुन मधून मधून घरी ये जा असते.
5) श्री अच्युत शंकर अभ्यंकर- स्वतःचे घर नाही
6) श्री मधुकर यशवंत अभ्यंकर-स्वःत व पत्नीसह राहतात.
7) श्री माधव प्रभाकर अभ्यंकर- मुलगा व पत्नी राहतात.