जांभुळपाडा हे गाव रायगढ जिल्ह्यात (पूर्वीच्या भोर संस्थानात) ठाणे शहरापासून 70 कि.मी. व खोपोलीपासून 10 कि.मी. अंतरावर ठाणे-पाली मार्गावर आहे. गावा जवळच अंबा नदी वाहते. गावात अभ्यंकर, बोडस, जोशी, लेले इत्यादींची घरे असून रामेश्वर, हनुमान, दशभुजा सिद्धिविनायक मंदिर,श्रीराम मंदिर, विष्णू मंदिर अशी मंदिरे असून व्याघ्रेश्वर देव हा ग्रामदेव मानतात. गावची वस्ती अंदाजे 5-6 हजार आहे. व गेल्या 24-25 जुलै 1979 रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक गुरेढोरे, माणसे वाहून मृत्युमुखी पडली त्यानंतर गावचा कायापालट होत आहे.
या ठिकाणी अभ्यंकरांचे एकच राहते घर असून तिथे श्री यशवंत त्र्यंबक अभ्यंकर व कुटुंबीय राहतात. त्यांचे कडे इ.स. 1910 पासून पोष्ट ऑफिस आहे.इतर घरे उध्वस्त झाली आहेत. कुर्धे गावाहून हरभट अभ्यंकर जांभुळपाडा येथे 1750 चे सुमारास आले असे त्र्यंबकेश्वरीचे लेखावरुन समजते.
जांभुळपाडा मूल गाव म्हणून सांगणा-या बंधूकडून मिळलेल्या माहितीच्या आधारे कुलवृत्तांत घराणी दर्शविली आहेत.