आरोस हे गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यात (पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानात) सावंतवाडी-सातार्डा या रस्त्यावर सावंतवाडी पासून 16 मैलावर असून पूर्वी तिथे घनदाट जंगल होते. आरोस येथे श्रीदेव गिरोबाचे मंदिर असून सभोवती काळे,अभ्यंकर इत्यादि ब्राह्मणांची वस्ती आहे. चरितार्थासाठी, शेती व नारळ सुपारीची बागायती जमीन आहे. त्याला गिरोबाची वाडी असे म्हणतात. या ठिकाणी इ.स. 1345 ते 1350 पासून अभ्यंकरांची वस्ती आहे.आजही आरोस येथे अभ्यंकर बंधूंची दोन-तीन घरे आहेत. काही बंधू मात्र नोकरी निमित्त स्थलांतर करुन दुसरीकडे रहावयास गेले. आरोस हे मूळगाव म्हणून सांगणा-या कुलबंधूंनी दिलेल्या माहितीच्या आधारे शक्य तेवढी माहिती मिळवून कुलवृतांत्तात दिलेली आहे.
कुळघर्म-कुळाचार- सर्व बंधू श्री गिरोबा कुलदैवत मानतात. शिवाय सातेरीदेवी कुलदेवता म्हणून मानतात. कुळाचारा संबंधी विशेष म्हणजे नवरात्र,श्री महालक्ष्मी इत्यादि सण साजरे करतात.