कुर्धे हे गांव रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून 21 कि.मी. अंतरावर आहे (पावस पासून अंदाजे 5 कि.मी.) रत्नागिरी पुर्णगड या रस्त्यावर आहे. गावाची संख्या सुमारे 1500 असून पूर्वी कुर्धे येथील मेरवीची वाडी होती. परन्तु आता वेगळे गाव म्हणून समजतात. तथापि पोस्ट ऑफिस मेरवी येथेच आहे. फडके, बेहरे, अभ्यंकर, जोशी अशी ब्राह्मणांची घरे आहेत. फडके कुलवृतांतात (पृष्ठ क्र.150) म्हटल्याप्रमाणे हा गाव शके 1490 ते 1500 (इ.स. 1568 ते 1578) या दरम्यान कोणी अभ्यंकर व फडके या दोघा मामा-भाच्यांनी वसविला. हे अभ्यंकर व फडके अनुक्रमे मामा भाचे जवळच्याच आगरगुळे या गावी राहात होते. आगरगुळे, माडबंदगुळे व गावंढेगुळे गणेशगुळे या चार गावांचा मिळून आता गणेशगुळे हा मोठ गाव झाला आहे. त्या गावचे दक्षिण हद्दीस लागूनच कुर्धे गावाची वसाहत सुरु आहे. गाव तीन कि.मी. लांब व एक कि.मी. रुंद असून गावात बगायती व शेती हे प्रमुख व्यवसाय आहेत. गावात सर्वेश्वर आणि महाविष्णू यांची मंदिरे असून गोकुळाष्टमी व महाशिवरात्री हे दोन मोठे सण उत्सव लोक साजरे करतात. कुर्ध्यास जाण्यासाठी हल्ली रत्नागिरी ते पूर्णगड जाणारी एस. टी. बस गणेशगुळ्यातून कुर्धे गावातून महाविष्णूचे देवळावरुन जाते. ती सोयीची आहे. महाविष्णू मंदिराचे एका बाजूस सर्व अभ्यंकर व दुस-या बाजूस सर्व फडके यांची घरे आहेत. सध्या अभ्यंकर कुळातील 5 घराण्यांची घरे असून खालील कुलबंधूंचे कुर्धे येथे वास्तव्य आहे.
खोत घराणे-
1) श्री विश्वनाथ रघुनाथ अभ्यंकर
2) श्री अशोक दत्तात्रय अभ्यंकर
(3) श्री दिनकर सखाराम अभ्यंकर-मेरवी
सावकार घराणे-
1) विष्णू दामोदर तथा दादा अभ्यंकर, वय 75
2) विश्वनाथ दामोदर अभ्यंकर- पोलीस पाटिल
(3)सुहास यशवंत अभ्यंकर
दिक्षित घराणे-नरहर वासुदेव उर्फ बापू दिक्षित अभ्यंकर
भजू घराणे- विनायक गणेश अभ्यंकर
मोरोपण्त घराणे- ह्या घरात शंकर लक्ष्मण अभ्यंकर, रा. पुणे हे अधून मधुन राहतात.
कुर्धे-उवत-मुंबई-पुणे- बडोदे- घराणे- हे खोत घराण्यांपैकीच. यांची हल्ली वस्ती कुर्धे येथे नाही.