मालगुंड हे गांव रत्नागिरी जिल्ह्यांत सुप्रसिद्ध गणपतीपुळे या स्थानकाजवळ समुद्र किनारी आहे. सुप्रसिद्ध कवि केशवसुत यांचे हे जन्मगांव. या ठिकाणी दामले, केळकर, या प्रमाणे अभ्यंकरांचे घर आहे. ते तिथे ग्रामोपाध्ये होते. सध्या मात्र एकच अभ्यंकर कुटुंब तिथे राहात आहे. पण त्याचा या मूळ घराण्याशी संबंध होता किंवा कसे ते अपु-या माहितीमुळे निश्चित पणे सांगता येत नाही. म्हणून त्यांचे घराणे क्र. 2 दाखवून वंशावळी व व्यक्तिपरिचय वेगळा दिला आहे. या घराण्याचा मूळ पुरुष काशिनाथभट्ट अभ्यंकर असून त्याला रामचंद्र व लक्ष्मण असे दोन पुत्र होते. रामचंद्र यांस महादेव, काशिनाथ व बाळकृष्ण असे तीन पुत्र होते व लक्ष्मण यांस गंगाधर हा एकच पुत्र होता. रामचंद्राचे वंशज पुढे उपजीविकेसाठी वाई, सातारा, पुणे मुंबई, कोकणात दिवे-आगर(हबसाण) इ. ठिकाणी वाढत गेले. तर लक्ष्मण यांचे वंशज जागपूर वर्धा, जबलपूर अशा मध्य प्रांतात आजही आढळतात. या घराण्याचा वंशवृक्ष मोठा व विखुरलेला असल्यामुळे सोयीसाठी या ग्रंथामध्ये त्याचे भाग पाडून ज्यागावी पुढे वंश वाढत गेलात्याचे नाव मालगुंड नावापुढे लावून क्रमश: घराणे 1, 2 या प्रमाणे वंशावळी व त्या व्यक्तीची माहिती दिली आहे.