अभ्यंकरांचे कुलदैवत

अभ्यंकरांचे कुलदैवत म्हणून विविध देवदेवतांचा निर्देश येतो. कुर्ध्याचे महाविष्णु व महागणपति, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई, अंबेजोगाईची योगेश्वरी वा जोगेश्वरी वा जोगाई, गुहागरचा व्याडेश्वर, कोकणचा आदित्यनाथ इत्यादी दैवते अभ्यंकर कुलाच्या देव-देवता म्हणून पूजल्या जातात. वरवर नावांची भिन्नता असली तरी एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति, या ऋग्वेद वचनाप्रमाणे चित् तत्त्व एकच आहे, हे ज्ञानोपासक अभ्यंकरांना वेगळे सांगावयास नकोच.

व्याडेश्वर हे शंकराचेच रुप आहे. व्याडेश्वर म्हणजे क्रूरांना शासन करणारा. तळकोकणात वस्ती करणा-यांना अभय देणारे परमेश रुप म्हणजे व्याडेश्वर. अभ्यंकरांचे कुलदैवत अंबेजोगाईची योगेश्वरी वा जोगेश्वरी वा जोगाई व गुहागरचा व्याडेश्वर हे होय.