अंबेडे हे गाव गोवा प्रांतात सत्तरी(वाळपई) ह्या तालुक्याचे शहरापासून 4 कि.मी. अंतरावर असून म्हापसा ह्या प्रमुख शहरापासून 43 कि.मी. व पणजी पासून 45 कि.मी. वर आहे. येथे नियमित बस सेवा उपलब्ध आहे. या गावचे पोस्ट ऑफिस नगरगाव येथे आहे. शांतादुर्गाचे मंदिर असून गावची लोकसंख्या 300-400 येवढीच आहे. त्या ठिकाणी अभ्यंकरांचे एकच घर असून त्यांचे पूर्वज अंदाजे 400 वर्षापुर्वी तिथे आले व शेतीवाडी करुन राहिले. शिवाय भिक्षुकी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. अभ्यंकरांप्रमाणेच वझे, गाडगिळ, बर्वे, मराठे, भावे,जोशी, छत्रे, इत्यादि चित्पावन ब्राह्मणांची घरे आहेत. बागायती जमिनीत पोफळीची व नारळाची झाडे आहेत. शिवाय वरकस जमिनीत काजूची लागवड केली आहे.
पुर्वीची रत्नागिरी जिल्ह्यातील नारिंग्रे किंवा अन्य ठिकाणाहून आले असावेत पण निश्चित ठिकाण सांगता येत नाही. या कुटुंबातील चुलत बंधू बेळगांव शहापूर येथे वस्ती करुन आहेत असे अनंत गोविंद अभ्यंकर कळवितात. अनंत गोविंद अभ्यंकर यांना 4-5 पिढयांपूर्वीची माहिती नाही. जी माहिती त्यांच्या कडून मिळाली ती पुढे दिली आहे.
वरील ठिकाणाशिवाय गोवा प्रांतात कोलवाल ता. बारदेस, म्हापसा-खोर्लीं व पाळी-कोठंबी ता. सत्तरी या ठिकाणी तीन अभ्यंकर कुटुंबे आहेत. परन्तु त्यांचे मूळगांव आरोस, ता. सावंतवाडी असल्यामुळे त्यांची माहिती आरोस घराण्यात दिलेली आहे.