सोनगाव हे गाव चिपळूणपासून 10 कि.मी. अंतरावर असून त्या ठिकाणी एकच अभ्यंकरांचे घर आहे. य घराण्यातील मूळ पुरुष चिपळून येथे इ.स. 1750 चे सुमारास वस्तीस असावेत. त्यांचे वंशजातील गणेश नारायण यांनी चिपळूण येथे घाऊक व्यापाराचे दुकान(पेढी) घातली. ती प्रसिद्ध होती. त्यांचे वंशज आजही चिपळूण व आसपास आहेत. त्यांच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुलवृत्तांतात वंशावळी व व्यक्तिपरिचय देण्यात आला आहे.